Affiliated to Savitribai Phule University,Pune    Affiliation ID : PU/NS/AC/191/2022,   Unipune ID- CAAN021440

Admission Open: 2026-2027

मराठी विभाग

मराठी विभागाविषयी :-

मराठी विभागाची स्थापना सन 2022 मध्ये करण्यात आली. विभागामार्फत ३ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम चालविला जातो. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उच्च दर्जाचे भाषा कौशल्य विकसित केले जाते तसेच उद्योग, व्यापार, विज्ञान, मनोरंजन आणि सार्वजनिक क्षेत्रातील माहिती व्यवस्थापन व प्रक्रिया यांसंबंधी समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता निर्माण केली जाते. वेगाने विकसित होत असलेल्या भाषा कौशल्य व संवाद प्रणाली या आज जवळपास प्रत्येक संस्था आणि कंपनीसाठी अत्यावश्यक घटक बनल्या आहेत. या पदवीपूर्व अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तसेच आधुनिक भाषाविषयक संकल्पनांचे ज्ञान दिले जाते.

दृष्टी (Vision) :-

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण देणे तसेच त्यांच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक आणि सांस्कृतिक विकासास पूरक अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.

ध्येय (Mission) :-

ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागातील लोकांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार करणे तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने गतिमान जगात प्रवेश करून समाजासाठी विधायक योगदान देण्यास सक्षम बनविणे.

उद्दिष्टे :-

  • विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल आवड निर्माण करणे.
  • ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागातील लोकांसाठी उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
  • महाविद्यालयातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी अभिरुची निर्माण करणे.
  • प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी साहित्याच्या इतिहासाची माहिती देणे.
  • अभ्यासक्रमाबरोबरच सहशैक्षणिक व अतिरिक्त उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडविणे.
  • आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत समाजाच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्यांचे हस्तांतरण करणे.
  • विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचे ज्ञान देणे.

उपलब्ध अभ्यासक्रम :

अभ्यासक्रम पात्रता कालावधी प्रवेश क्षमता
बी.ए. इयत्ता १२ वी उत्तीर्ण ३ वर्षे 120

उपक्रम :

  • लेखक आपल्या भेटीला
  • वक्तृत्व स्पर्धा
  • काव्यवाचन

विभाग प्रमुख : सहा.प्रा.कावेरी गोसावी (M.A. Marathi, SET, Phd.Appearing)


विभागाचे SWOC विश्लेषण व भविष्यातील योजना :

संधी (Opportunities) :

  • बहुतेक विद्यार्थ्यांना एम.ए. पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध आहे.
  • वाचन व भाषांतर कौशल्यासाठी प्रशिक्षण.
  • साहित्य समीक्षा व परीक्षण लेखनासाठी प्रोत्साहन.
  • विविध विषयांमध्ये मराठी भाषेचा प्रसार.

आव्हाने (Challenges) :

  • स्पर्धात्मक जागतिक वातावरणात मराठी भाषेचा व्याप्ती वाढविणे.
  • साहित्य व इतर शाखांमध्ये आंतरशाखीय अध्ययनाला प्रोत्साहन देणे.

भविष्यातील योजना (Future Plan) :

  • शुद्धलेखन, संपादन आणि भाषांतर या क्षेत्रांमध्ये करिअराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे.
  • मराठी बोलीभाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकजीवनाच्या संदर्भात अभ्यास केंद्र विकसित करणे.
  • व्यावसायिक वातावरणात विभाग टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.